Shri Hartalika Devi Chi Aarti
।। श्री हरितालिका देवीची आरती ।।
जय देवी हरितालिके ।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओंवाळीतें ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु० ॥
हर-अर्धांगीं वससी ॥
जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथें अपमान पावसी ।
यज्ञकुंडीं गुप्त होसी ॥ जय०
॥ १ ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं ।
कन्या होसीं तूं गोमटी ॥
उग्रतपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठीं ॥ जय०
॥ २ ॥
तपपंचाग्निसाधनें ।
धूम्रपानें अधोवसनें ॥
केलीं बहु उपोषणें ।
शंभुभ्रताराकारणें ॥ जय०
॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टीं ।
हें व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हां वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावें संकटीं ॥ जय०
॥ ४ ॥
काय वर्णूं तव गुण ।
अल्पमति नारायण ॥
मातें दाखवी चरण ।
चुकवावें जन्ममरण ॥ जय०
॥ ५ ॥