Shri Gajanan Maharaj Aarti Lyrics
।। श्री गजानन महाराज आरती ।।
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड़-मुड ताराया । जय देव जय देव || धृ ||
निर्घुण ब्रम्ह सनातन अव्यव अविनाशी |
स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी |
ते तू तत्व खरोखर नि:संशय असशी |
लीलामात्र धरली मानव देहासी || जय देव जय देव || 1||
होउ न देसी त्याची जाणीव तू कवणा
करुनि ” गण गण गणात बोते ” या भजना |
धाता हरिहर गुरुवर तुचि सुखसदना |
जिकडे पाहवे तिकडे तू दिससी नयना ॥जय देव जय देव || 2 ||
लीला अनंत केल्या बंकट- सदनास |
पेटविले त्या अग्निवाचुनि चिलमेस |
क्षणात आणिले जीवन निर्जल वापिस |
केला ब्रम्हागिरीच्या गर्वाचा नाश ॥ जय देव जय देव || 3 ||
व्याधि वारुन केले कैका संपन्न |
करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणुचे मान्य करा कवन ॥ जय देव जय देव || 4 ||
जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया
अवतरलासी भूवर जड़-मुड ताराया || जय देव जय देव ||
॥ अनंतकोटि ब्रम्हाण्ड नायक महाराजजी राज योगिराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सतगुरु श्री गजानन महाराज कि जय ||