Raksha Bandhan Marathi Messages
बहीण आणि भावाचे नाते
हे सगळ्यात प्रेमळ असे नाते असते ,
त्यात प्रेम पण खूप असते, कधी भाडंण
होते तर कधी खूप आठवण येते
असे हे नाते असते.
रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….
काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!
राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…
रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..
बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.