Happy Propose Day Message Pic For Gf
आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
Happy Propose Day
Propose Day – प्रपोस डे संपूर्ण जगभरात 8 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग ‘व्हॅलेंटाइन डे’ ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? ‘प्रपोज’ करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अतिउत्साह महागात पडू शकतो. ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन’ हे तत्त्व लक्षात ठेवा.