Pola Status In Marathi
आपल्या तोंडचा घास ज्या सर्जराजाच्या कष्टाने
आपल्याला मिळतो, पिढ्यानपिढ्या मिळत आला आहे,
त्या सर्जाराजाला किमान एक दिवस कृतज्ञता
व्यक्त करायचा दिवस म्हणजेच बैलपोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा
भारतीय संस्कृतीत अमूल्य योगदान देणाऱ्या वृषभाचा कृतज्ञता सोहळा
बळीराजा प्रमाणेच अविरत कष्ट करणार्या…
शेतकर्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच नंदीराजाचा दिवस पोळा
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही
शेतीला पर्याय, बैल पोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!
आला आला पोळा बैलांना सजवा
गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा
वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा.!!
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
तूझ्या शॄंगारासाठी नेहमी
शेतकरी राजा सज्ज असतो
असा हा सण बैल पोळा…
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वावर वाडा सारी
बापाची पुण्याई
किती करू कौतुक तुझं
मीच त्यात गुंतून जाई
तुझ्या या कष्टाने फुलून
येते ही काळी आई
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
तू रे वाहान शिवाच,
कोणी म्हणे तूला नंदी,
तूझ्या असन्याने आहे
दारी चैतन्याची नांदी.