Bail Pola Picture For Whatsapp
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय.
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Tags: Smita Haldankar
पिठोरी अमावस्या – बैलपोळा
आषाढातल्या अमावास्येप्रमाणेच श्रावणातील अमावास्याही आपल्या परंपरेत सण म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात देशावरल्या भागात हा दिवस बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. या सणास बेदूर असेही म्हणतात. हा सण अनेक ठिकाणी वत्सल स्त्रिया व्रत म्हणून साजरा करतात. विशेषकरून संततीसाठी व असलेली संतती निकोप, निर्व्यसनी व चारित्र्यसंपन्न रहावी म्हणून हे व्रत केले जाते. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणाची आस प्रत्येक मातेला असतेच त्यामुळे स्त्रिया हे व्रत मनोभावे करतात व हा वारसा पुढील पिढीला देतात. मातृदिन म्हणूनही या दिवसाचे महत्व फार मोठे आहे.
कुलाचार म्हणूनही हा सण साजरा होतो. अलीकडच्या काळात पूर्वीसारखे धार्मिक विधी न करता स्त्रिया या दिवशी उपवास करतात. सायंकाळी देवाची पूजा करतात. त्यानंतर घरात जेवढी मुले असतील त्यांना गुळाची अथवा पुरणाची पोळी, त्यावर खीर व कणकेचा लहान दिवा ठेऊन वायन लावतात. मुलाने अथवा मुलीने आईच्या मागे बसायचे असते. मग अतिथी कोण असे आईने विचारते आणि मुलाने आपले नाव सांगून वायन घ्यायचे व ते भक्षण करायचे. याप्रमाणे सर्व मुलांना वायने लावली जातात. या व्रतामुळे संतती प्राप्त होते. जन्मलेली संतती सद्गुणी निजपते व व्यसनी आणि वाममार्गाला लागलेली संतती या व्रतामुळे योग्य मार्गावर येते अशी समाजात धारणा आहे. देशावर या दिवशी बैलपोळा साजरा करतात. तेथील शेतकरी आपल्या बैलांना या दिवशी देवतेचा मान देतात.
सकाळी त्यांना स्वच्छ अंघोळ घालतात. त्यांच्या शिंगाना बाशिंग बांधतात. अंगावर रंगीबेरंगी ठिपके काढतात. गळ्यात सुंदर घुंगरमाळा घालतात, पाठीवर झूल टाकतात. देवासारखे त्यांना शोभिवंत करतात. सायंकाळी त्यांची पूजा करून ओवाळतात. पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना भरवतात. या दिवशी शेतकरी बैलांना अत्यंतिक मायेने वागवतात. त्यांच्याकडून कोणतेही काम करवून घेत नाहीत. ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीच्या बैलाच्या मुर्त्या आणून पूजा करतात. आपल्या संस्कृतीने उपयुक्त व पाळीव प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासठी अशा सणांची योजना केलेली आहे. बैलपोळा हा त्यातील अतिशय भावमधुर सण होय. वेद काळात गाईस गोधन मानले जात असे. पोळा हा गोधनाचे महत्व सांगणारा सण आहे.