Omkar Pradhanrup Ganeshache
“ॐ कार प्रधान रूप गणेशाचे”
ॐ कार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला || १ ||
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ….. || २ ||
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||
Leave a comment