Nag Panchami – नाग पंचमी Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

नागपंचमी

नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.

नागपंचमीच्या दिवशी मुख्यत: स्त्रिया नागाची पूजा करतात. जिवंत नागाऐवजी नागाची मातीची मूर्ती पाटावर ठेवून त्याची पूजा करतात. दुध लाह्यांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी सर्पाकृती भाज्या भक्षण न करण्याची प्रथा आहे. तसेच विळी, चाकू, सुरी, तवा या साधनांचा उपयोग न करता अन्न केवळ शिजवून ते खाण्याची प्रथा आहे. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही.


Subscribe

Loading