Merry Christmas Marathi Wishes For Family
कुटुंबाला द्या ख्रिसमसला प्रेमपूर्ण शुभेच्छा
आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.
ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया.
मला खूप आनंद झाला आहे की यंदाचा ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करत आहे. माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. या जगातच मला माझा आनंद नेहमी गवसला आहे आणि भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस माय स्वीट फॅमिली.
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.
जरी मी ख्रिसमस कुठेही सेलिब्रेट केला तरी माझं मन नेहमीच माझ्या कुटुंबासोबत असेल. माझ्या प्रिय आईबाबा आणि भाऊ-बहिणींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला खूपच मिस करतोय. मेरी ख्रिसमस.
ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत स्पेंड करणं हे माझं सर्वात मोठं ख्रिसमस गिफ्ट आहे. ख्रिसमस म्हणजे कुटुंब आणि कुटंबासोबत केलेली धमाल. मेरी ख्रिसमस.
व्हिटेंज ब्रंच, चर्चेस, कुटुंब, गिफ्ट्स, लाईट्स, ख्रिसमस ट्रीज आणि प्रेयर्स याचा आनंद पूरेपूर घेणं म्हणजे ख्रिसमस. तुम्हा सगळ्यांनाही हा आनंद मिळो. मेरी ख्रिसमस.
ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट करण्याचा काळ नसून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचाही सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या कुटुंबाशिवाय हा दिवस मी साजरा करूच शकत नाही. थँक्यू माय वंडरफुल फॅमिली. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.