Marathi Suvichar – मराठी सुविचार Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Veer Savarkar Yanche Vichar

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Loading...

वीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।

मात्र अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देशाकरिता ।।

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा ,
मज भरतभूमिचा तारा ।।

प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसार्खेच आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिध्द आहेत.

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.

एक देव एक देश एक आशा ।।
एक जाती एक जीव एक आशा ।।

यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.
आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा ? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच!

अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!

स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.

View More

Aayushya Khup Kami Aahe Te Aanandane Jaga

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...


आपल्यापैकी सगळ्यांचेच *आयुष्य मर्यादित आहे* आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .!

*मग जीवनात खुप काटकसर* कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .

*आपण गेल्यानंतर पुढे काय होणार* याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?

*जीवनाचा* आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल …!

*तुमच्या मुलांची* खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .

*मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .

*जन्मापासून मृत्युपर्यंत* नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .

*तुम्ही कदाचित* चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .

*या वयात* प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !

*एक दिवस* आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या.

*आणखी एक गोष्ट* तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत .

*सगळ्यात महत्वाचे* म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपणूक करा आणि हो ! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.

*मित्र नसतील तर* तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणते…

*आयुष्य खुप कमी आहे* , ते आनंदाने जगा …

View More

Subscribe

Loading