Veer Savarkar Yanche Vichar
वीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देशाकरिता ।।
आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा ,
मज भरतभूमिचा तारा ।।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसार्खेच आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिध्द आहेत.
ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.
एक देव एक देश एक आशा ।।
एक जाती एक जीव एक आशा ।।
यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.
आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा ? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच!
अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!
स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.