देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना. पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.
Tags: Smita Haldankar
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.
कर्माचे फळ माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
श्रद्धेची मुळे हृदयात असतात, जिभेच्या टोकावर नसतात.