Kuni Asel Tar

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर 
रुसायला बर वाटत ………
ऐकणारे कुणीतरी असेल तर 
मनातल बोलायला बरे वाटते …..
कौतुक करणारे कुणीतरी असेल तर 
थकेपर्यंत राबायला बर वाटत …….
आशेला लावणार कुणीतरी असेल तर 
वाट बघायला बर वाटत ………..
आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तर
मरेपर्यंत जगायला बर वाटत ………..!









