Garaj Aahe Aaj Mala..


गरज आहे आज मला

गरज आहे आज मला………
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या हातांची … …
गरज आहे आज मला………..
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून
टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला…..
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या
त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला……….
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी
प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू
जवळ आहेस या जाणिवेची गरज
आहे मला खूप गरज आहे….

More Entries

  • Asach Aahe Mi

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading