Ganesha Jayanti – गणेश जयंती Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

गणेशजयंती

माघ शु. चतुर्थी हि गणेशजयंती म्हणून साजरी केली जाते. कालमापनातील अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणारी तिथी म्हणजे चतुर्थी ही आहे. अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही कृष्ण पक्षात येते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी होते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात, तर माघ शुक्ल चतुर्थीला तीळ चतुर्थी, कुंद चतुर्थी वा तिलकुंद चतुर्थी म्हणतात.

या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून या दिवशी गणेशजयंती असते. काही कुटुंबात या दिवशी गणपतीही बसवतात. गणपतीला तिळाच्या २१ लाडूंचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. देवळात या उत्सवाच्या निमित्ताने श्रीगणेशास सहस्त्रावर्तन करतात. पाच दिवस गणपतीस वेगवेगळ्या मिष्टात्रांचा नैवेद्य दाखवतात. चतुर्थीच्या दिवशी मात्र उपवास करतात.

Ganesha Jayanti साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Ganesha Jayanti Photo Frames


Subscribe

Loading