Birthday Wishes For Father In Marathi
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा! पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ माणसाला अर्थात बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो. पप्पा मी खूप आनंदी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन
आशीर्वादाने भारून टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी
आयुष्य मिळावे हीच सदिच्छा! पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे कारण तुम्ही माझे वडील आहात. वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या वाईट सवयी तुम्ही कशा काय सहन केल्यात बाबा? आत्ता मला समजते आहे. माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार. हॅप्पी बर्थडे बाबा.
आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि
परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो..
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
या स्वार्थी जगात तुम्हीच आमचा अभिमान आहात. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात सुपरमॅन म्हणून जर कोणी असेल तर तू आहेस बाबा. धन्यवाद. तू मला नेहमीच प्रेम आणि काळजी दाखवली आहेस. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे ही कायम आनंदाने भारंभार राहतील. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते तर कोणीही दुःखी राहिले नसते. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात..
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मी उत्तम आहे कारण तू मला कधीही हार मानू देणार नाहीस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. हॅप्पी बर्थडे पप्पा
मी नेहमी चांगले आयुष्य जगू शकेन यासाठी तू खूप कष्ट केले आहेस बाबा. आपल्याकडे कुटुंब म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आमच्याकडे कायम असाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी आपण बरेच काही केले. मनापासून धन्यवाद मला तुमच्या बाबांचा खरोखर अभिमान आहे, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
बाबा, तुझ्यासारखेच व्हावे अशी माझी इच्छा होती. आणि आज, जर मी तुझ्यासारख्या निम्म्या गोष्टीजरी करू शकत असेन, तर मी स्वतःला काहीतरी उल्लेखनीय साध्य केले आहे असे आयुष्यात समजेन. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र कायम होतात आणि राहणार. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा बाबा
कधीही बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा अखंडित झरा वाहत राहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यात तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी मिळो आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची जिद्द असेल आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि काळजी असेल तर ती व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी कोणी असूच शकत नाही. बाबा तुम्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वतःच्या गरजा कमी करून माझी इच्छा पूर्ण करणार्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित करणारे वडील मला मिळाले, माझे खरोखर भाग्य आहे. तुम्हाला संपूर्ण वाढदिवस, आनंददायक आणि आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा!!
बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात तुम्ही माझ्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा नक्कीच कमी नाही मी खूप भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे वडील मला मिळाले वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
तुमच्यासारखे प्रेमळ वडील मिळाले हे माझे भाग्य, अशा माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!