Balipratipada – बलिप्रतिपदा Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Balipratipada Chi Sampurn Mahiti

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...

बलिप्रतिपदा ची संपूर्ण माहिती

बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते.
हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे.
Balipratipada Chya Hardik Shubhechha
बलिप्रतिप्रदेची कथा अशी – बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथि जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये; पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे.
अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान. मुंजा मुलगा लहान असतो व तो `ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे `भिक्षा द्या’ असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, “काय हवे ?” तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलिराजाने त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्यान पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले. तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने “तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)”, असे बलिराजास सांगितले. तेव्हा `आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे’, असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्वििन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात.
बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते; मात्र शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून. अभक्ष्यभक्षण, अपेयपान व अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात) पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशी ही दिवाळी.

– बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बलि व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी,
– त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.
– या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात.
– दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो.
– या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात.
– या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात.

View More

Subscribe

Loading