Bail Pola Wishes Images( बैल पोळा शुभेच्छा इमेजेस )

Bail Pola Wish Photo
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

Bail Pola Quote Picture
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,
बैल पोळा सणाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!
वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।।
किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई ।।
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आपल्या अन्नदात्यासोबत राबणारा हा साथीदार, त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणजेच “पोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा
आला रे आला बैल पोळा,
गाव झालं सारं गोळा..
सर्जा राजाला घेऊनि,
सारे जाऊया राऊळा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.!!

Bail Pola Quote Pic
आज बैलाले खुराक,
रांधा पुरणाच्या पोया..
खाऊद्या रे पोटभरी,
होऊ द्या रे मंगदुल..
बैलपोळा निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा.!!
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही
पर्याय, तसेच कष्टाविना मातीला
आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय.
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
आपल्या तोंडचा घास ज्या सर्जराजाच्या कष्टाने
आपल्याला मिळतो, पिढ्यानपिढ्या मिळत आला आहे,
त्या सर्जाराजाला किमान एक दिवस कृतज्ञता
व्यक्त करायचा दिवस म्हणजेच बैलपोळा.
सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या शुभेच्छा
‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’!
जगाचा पोशिंदा बळीराजा आणि त्याचा कष्टाचा सोबती बैल
यांच्यातल्या मैत्रीचं आणि प्रेमाचं प्रतीक म्हणजे “पोळा”
‘बैल पोळा’ सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळा च्या
हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय