Ashadhi Ekadashi – आषाढी एकादशी Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

आषाढी एकादशी

आषाढ महिन्यात किमान दोन एकादश्या असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. तिथीची वृद्धी झाली तर आणखीही एकादशी असू शकतात.

तिथीची वृद्धी :-
देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी, अशा तिथी वृद्धी. या चंद्रमास गणनेतील फरकामुळे होतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.

देवशयनी एकादशी :-
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.


Subscribe

Loading