Tulsi Vivah Chya Shubhechha

आज सजली तुळस
शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं
मोहरला पान पान..
अंगणात उभारला
आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची
त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची
आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली
गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे सातचा मुहूर्त
करू नका हो उशीर,
पण येताना जरूर
तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
















