Smita Haldankar - Wishes, Greetings


Shravani Somvar Hardik Shubhechha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 15
Loading...


सुप्रभात मित्रांनो ॐ नमः शिवाय
श्रावण सोमवार च्या खुप खुप शुभेच्छा.
आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत
आणि उत्तरोत्तर आपली भरपूर प्रगती होवो
ही महादेवाच्या चरणी प्रार्थना..
हर हर महादेव
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
हे भॊळ्या शंकरा – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा …. शंकरा
हे भॊळ्या शंकरा ….. महादेवा
हे भॊळ्या शंकरा ….. हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा – २
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃

बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃

बेलाच्या पानाची
त्रिशूल डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती …. हॊ – २
त्रिशूल डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती – २
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃

बेलाच्या पानाची
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची 🌺🍃

Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Loading...


।।बहिण।।

।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।

।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।

।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।

।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।

।। दुःखाच्या डोहावरील
आधाराचा सेतू।।

।। निरपेक्ष प्रेमामागे
ना कुठला हेतू।।

।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।

।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।

।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।

।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।

।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी
या नात्यात ओढ आहे.।।

।।म्हणूनच बहिणीचं हे नातं
चिरंतन गोड आहे.।।

।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।

।।जागा जननीची भरुन
काढण्या निर्मीली आईनंतर ताई.।।

।।निर्मिली देवाने आई नंतर बहिण.।।

रक्षाबंधनच्या हार्दीक शुभेच्छा

Subscribe

Loading