दिपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. लक्ष्मीच्या सोनपावलांनी आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येवो. अंधकार दूर करून सर्वांचे आयुष्य आपल्या तेजाने उजळून टाकणाऱ्या दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष आरोग्यदायी शुभेच्छा.
View More
आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो, कर्माची वात, भक्तीचं तेल आत्म जाणिवेची ज्योत लावून आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो… हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा.. दीपावली शुभेच्छा! दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.. शुभ दिवाळी!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !