ऋतूमानाप्रमाणे आहार
“प्रत्येक ऋतूतील वातावरणाच्या बदलानुसार शरीरातील पचन व पोषण क्षमता कमी अधिक होत असते.त्यानुसार आहारात बदल न केल्यास अनेक व्याधिना बळी पडण्याची शक्यता असते.यासाठी आपण ऋतूनुसार आहार कसा घ्यावा ते बघुयात.
उन्हाळा –
1) सर्वप्रथम उन्हाळ्यातील आहार बघुयात. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे शरीरातील पाणी व खनिजे यांचे प्रमाण कमी होत असते ते भरून काढण्यासाठी आहारातील द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते.
2) फळांचे सरबत,नारळपाणी,भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे तसेच दररोज ३ ते ५ लिटर. पाणी प्यावे.
3) उन्हाळ्यात भूक व पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात त्यामुळे पचण्यास जड असे पदार्थांचे उदाहरणार्थ मासाहार ,उडीद .तेलकट ,मसालेदार पदार्थांचे सेवन करू नयेत.
4) कोकम,लिंबू सरबत ,डाळिंबाचा रस,फळामध्ये संत्री,मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.अशाप्रकारे उन्हाळ्याचा आहार सेवन केल्यास उन्हाळ्यात आहार सुलभ होऊ शकतो.
हिवाळा –
1) आता आपण हिवाळा या ऋतूत आहार कसा असावा याबद्दल माहिती घेऊयात.
2) हिवाळ्यामध्ये वातावरणातील थंडीमुळे भूक व पचनक्षमता दोन्हीही वाढलेले असते त्यामुळे या ऋतूमध्ये पचण्यास जड पदार्थांचे सेवन देखील अनेक वेळा हानिकारक ठरत नाही.
3) ऋतूत थंडींचा त्रास होऊ नये यासाठी मसाल्याच्या पदार्थांपैकी जिरे,लसून,मोहरी,सुंठ यांचा आहातारतील वापर वाढवावा.
4) दही,दुध,अंडी यांचे सेवन करावे.
5) या ऋतूत भरपूर व्यायाम करावा.
6) गहू,ज्वारी, तांदूळ,बाजरी यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.
7) सोयाबीन, डाळी,ड्राय फ्रुटचे प्रमाण वाढवावे.
पावसाळा-
1) पावसाळा या ऋतूत सततच्या पावसामुळे भूक मंदावलेली असते. परंतु पचन क्षमता ही उन्हाळ्यापेक्षा अधिक असते त्यामुळे या ऋतूत भूक वाढविण्यासाठी खारट व आंबट पदार्थांचा(लिंबू,लोणचे,चिंच) याचा आहारातील वापर वाढवावा.
2) फळांचा रस घेण्यापेक्षा नुसती फळे खावीत.
3) शक्यतो रस्तावरील उघडे (बाहेरील पदार्थ) टाळावेत आणि पाणी उकळूनच प्यावे जेणे करून दुषित पाण्याच्या संपर्कातून होणाऱ्या रोगांची लागण न होण्यास मदत होते.
4) आहारातील गोड पदार्थांचा समावेश वाढवावा.
अशा प्रकारे ऋतूमानानुसार आहारात बदल केल्यास व्याधी टाळता येऊ शकतात व शरीराला योग्य ते पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.”