Makar Sankranti – मकर संक्राती Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

मकरसंक्रांत साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Makar Sankranti Photo Frames

मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता, सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

या दिवशी स्त्रिया हळदी कुंकवाचा समारंभ करतात. वायन देतात . या दिवशी नदी अथवा समुद्रात स्नान करून दानधर्म करण्याची प्रथा आहे. सुवासिनी ब्राहाणाला सुगड देतात. या दिवशी तिळाचे लाडू करतात व ते इष्ट मित्रांना आप्त स्वकीयांना वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा व्यक्त करतात. पारस्पारिक प्रेम आणि मैत्रभाव दृढ करण्यासाठी हा सण साजरा करतात. तिळात स्निग्धता म्हणजे स्नेह हा गुण असल्याने या दिवशी तिळगुळ देतात.


Subscribe

Loading