Mahila Din Quotes In Marathi For Corporate Women
कॉर्पोरेट विश्वातील महिलांसाठी शुभेच्छा संदेश
1. अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या महिला करू शकत नाहीत – मिशेल ओबामा
2. एखाद्या राणीप्रमाणे विचार करा. कारण राणी कधीच अपयशाला घाबरत नाही. शिवाय अपयश हे देखील यशाची एक पायरीच असते – ऑप्रा
3. जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर एखाद्या पुरूषाला विचारा मात्र जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल तर ती एखाद्या महिलेलाच सांगा – मार्गारेट थॅचर
4. स्वतःसाठी विचार करणे ही एक ध्यैर्यपूर्ण कृती आहे – कोको चॅनल
5. जीवन ही एक परिक्षा आहे जिथे कोणताच अभ्यासक्रम नाही, प्रश्नपत्रिकादेखील सेट केलेली नाही एवढंच नाही तर तुमच्याकडे कोणत्याही उत्तरपत्रिकेचं आदर्श मॉडेलही नाही. – सुधा मुर्ती
6. यश, पुरस्कार, पदवी किंवा पैशांपेक्षा चांगले नातेसंबंध, दया आणि मानसिक शांती माणसासाठी फार महत्त्वाची आहे – सुधा मुर्ती
7. आपल्याला स्वतःविषयीची निर्माण केलेली धारणा बदलण्याची गरज आहे. तरच आपण महिला म्हणून उभं राहू आणि नेतृत्व करू शकू – बियॉन्से
8. कोणतीच महिला तिच्या शरीराविषयी योग्य निर्णय घेऊ शकत नाही असं नाही. कारण जेव्हा तिच्या हक्कावर हल्ला होतो तेव्हा ती लढू शकते – कमला हॅरीस
9. जी स्त्री तिचं मत मांडू शकते ती कणखरच असते – मेलिंडा गेट्स
10. स्त्रीवाद महिलांना कणखर बनवू शकत नाही कारण त्या आधीच कणखर आहेत. फक्त लोकांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कणखर करण्याची गरज आहे – जी. डी. अॅंडरसन
11. स्त्रीयांना द्या इतका मान की वाढेल आपल्या देशाचा मान
12. स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ, तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. महिला दिनाच्या शुभेच्छा