Hanuman Jayanti Chi Mahiti
हनुमान जयंती ची माहिती
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.
हनुमान म्हणजे सामर्थ्य, भक्ती आणि दास्यभावाचा सजीव पुतळा आहे. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
हनुमंताची रामनिष्ठा खरोखरीच अवर्णनीय होती. या अलौकिक गुणांचा प्रत्यक्ष प्रजेवर परिणाम व्हावा व छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेस सर्वसामान्य माणसाने आत्मग्लानी टाकून सर्व शक्तीनिशी योगदान करावं म्हणुन समर्थ रामदासांनी रामभक्तीला हनुमंताच्या उपासनेचीही जोड दिली. हनुमंताची उपासना म्हणजे स्वामी निष्ठेची भक्ती, शक्तीची पूजा आणि सेवाभावेचा आदर आहे.
तरुणाईला पराक्रमाचे आणि देशसेवेसाठी साहसाचे आव्हान या दिवशी मिळते. ते तरुणांनी जर स्वीकारले तर रामराज्य येणे फारसे कठीण नाही. रामनवमीप्रमाणे हा पण उत्सव भाविकजन उपवासाने साजरा करतात. हनुमंत हा सात चीरांजीवांपैकी एक चिरंजीव आहे.