Gauri Ganpati – गौरी गणपती Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

गौरी पूजा

गणपती उत्सवाच्या काळात अनुराधा नक्षत्र असलेल्या दिवशी गौरी बसवल्या जातात. ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची पारंपारिक प्रथा महाराष्ट्रात आहे. गणपती आल्यानंतर गौरीचे घरी आगमन झाल्याने घरात आनंद असतो. माहेरवाशीण या नात्याने स्त्रिया गौरीकडे पाहतात. तिच्याबद्दल त्यांना खूप जिव्हाळा वाटतो. कौटुंबिक व सौभाग्य सौख्यासाठीच स्त्रिया गौरी पूजन मोठ्या श्रद्धेने करतात. हळदीकुंकू, गाणी, परंपरागत लोकनृत्यकार, जागरण यामुळे कुटुंबात उत्साह असतो.


Subscribe

Loading