गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं, काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं. गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू.. आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना… गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…
“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना” गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!