Daughters Day Messages In Marathi From Mother

1. माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
3.माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा
4. इवले इवले हात हलवत मिचकावत होतीस डोळे, तुला कुशीत घेताच स्वर्गसुख मज झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
5. तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
6. तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
7. लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा.
8. माझी लेक माझी सखी परमेश्वराकडे एकच मागणं कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
9. मुलगा तोपर्यंत माझा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. पण तु माझी तोवर आहेस जोवर माझं आयुष्य संपत नाही. कन्या दिनाच्या शुभेच्छा (daughters day messages in marathi)
10. लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा
11. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
12. लाडाची लेक सोनुली माझी, आता होणार लवकर मीही आजी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
13.भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात. कन्या दिनाच्या शुभेच्छा
14. एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
15. मुलीचा जन्म म्हणजे आनंदाची उधळण. कन्या दिनाच्या शुभेच्छा
16. हॅपी डॉटर्स डे डीअर, तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस
17. माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.
18. प्रिय परी, तुला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा, तू माझ्यासाठी जणू देवाकडून मिळालेली भेट आहेस
19. कन्या दिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकन्येला, मला आशा आहे की, तू अशीच प्रेमळ आणि गोड राहशील सदैव.
20. माझ्या परीराणीला, जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आईच तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.

















