Dasara – दसरा Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

दसरा

दसरा हा सण अश्विन शु. दशमीला म्हणजे नवरात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटाची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात दसर्‍याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापार्‍यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. हिंदू पंचांगाप्रमाणे या दिवशी साधारणतः श्रवण नक्षत्र राहते.

प्रभू रामचंद्रानी याच दिवशी रावणाचा वध करून विजय संपादन केला होता. महिषासुर या प्रबळ दैत्याशी सतत दहा दिवस युद्ध करून त्याचा वध याच दिवशी देवीने केला, अशी पुराण्यातील कथा आहे. या दिवशी विजयाचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आपण पाळतो म्हणूनच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. सीमोल्लंघन करून शमी व आपट्याची पाने सोन म्हणून वाटण्याची परंपरा महाराष्ट्रात आजही आहे. अश्विन हा सुगीचा म्हणजेच समृद्धीचा महिना आहे. शेतात पिकलेले धान्य म्हणजे समृद्धीचे सोनेच आहे. या अर्थाने या दिवशी सोने वाटण्याची प्रतिकात्मक प्रथा रूढ झाली.

दसरा साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Dussehra Photo Frames


Subscribe

Loading