Baldin Marathi Shubhechha
बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका,
हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा,
उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून
घेतलेले बंधन झुंगारून द्या..
लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे,
आपण जगासाठी नाही..
शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे
आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका..
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!