Advantages Of eating Pomegranate


Advantages Of eating Pomegranate

डाळिंब खाण्याचे फायदे

” डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.

1) रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.

2) यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.

3) फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.

4) पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.

5) डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.

6) वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.

7) खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.

8) डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.

9) मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.

10) डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.

11) कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.

12) वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.

13) कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.

14) डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात “

More Entries

  • Benefits of eating papaya
  • Benefits of eating Figs

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading